सिरसाळा न्यूज : जैविक शेती ने शेतकऱ्यांच्या आर्थीक उत्पन्नात वाढ शक्य असल्याचे प्रतिपादन बीड जिल्ह्य़ाचे जिल्हाअधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शेतकरी मेळाव्यात केले आहे. सिरसाळा येथे मयांक गांधी यांच्या ग्लोबल विकास ट्रस्ट च्या वतिने ह्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१६ पासुन मयांक गांधी ग्लोबल विकास ट्रस्ट च्या मार्फत बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात शेतकऱ्यांच्या आर्थीक उत्पन्न वाढीचा संकल्प घेऊन कार्य करत आहेत.काल दिनांक १२ रोजी सिरसाळा (कान्नापूर) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. ह्या मेळाव्यास कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक के. एम.प्रसन्ना, जिल्हाअधिकारी राधाबिनोद शर्मा उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बन्सी गिर गोशाळा अहमदाबाद चे अध्यक्ष गोपाल सुतारिया, एसबीआय मुख्यधिकारी अजय कुमार सिंह, ए.यु . बॅंक चे वरिष्ठ उपाध्यक्ष विवेक त्रीपाठी, नाबार्ड चे माजी एमडी के.जी.कर्माकर, सायंटिस्ट सेंट्रल सिल्क बोर्ड ऑफ इंडिया औरंगाबाद चे रामप्रकाश वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून करत उपस्थित शेतकऱ्यांची मने जिंकून घेतली. पुढे बोलतांना शर्मा म्हणाले कि,बीड जिल्ह्यातील जवळपास लोकांचा उधार निर्वाह व उत्पन्नाचे साधन शेती आहे. पंरतु निसर्गाचा लहरी पणा शाश्वत शेती होऊ देत नाही. कमी जास्त पाऊसाने शेतकऱ्यांच्या पिक उत्पन्नाचे नुकसान होत असते, शेतीला जोड व्यावसाय शेतकऱ्यांनी करायला हवा आणि विशेषत जैविक शेती शाश्वत उत्पन्न देऊ शकते.मयांक गांधी यांची ग्लोबल विकास ट्रस्ट शेतकऱ्यांच्या आर्थीक उत्पन्नाचा स्तर वाडवण्यासाठी कार्य करत आहे. हि बाब आनंदाची आहे.
शेतकऱ्यांनी जैविक शेतीचा वापर करावा असेही राधाबिनोद शर्मा या वेळी आपल्या भाषणात म्हणाले आहेत. कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर उपस्थित मान्यवर व राधाबिनोद शर्मा यांनी बैलगाडीतून त्या ठिकाणच्या शेतीचा फेरफटका मारला.
परळी चे तहसीलदार शेजुळ, धारूर चे तहसीलदार स्वामी हे देखील ह्या कार्यक्रमास उपस्थित होते. ग्लोबल विकास ट्रस्ट चे परळी येथील मयांक गांधी यांचे सहाकरी डाॅ.वंगे उपस्थित होते.
● मराठवाड्याची छबी आम्ही बदलणार – मयांक गांधी :
सन २०१६ साली मराठवाड्यात ग्लोबल विकास ट्रस्ट च्या माध्यमातून कार्य करताना संकल्प केला आहे कि, मराठवाड्याची छबी बदलल्या शिवाय राहणार नाही. इथल्या शेतकऱ्यांचे एक्करी उत्पन्न १ लाखा पेक्षा अधिक करण्याचा आमचा माणस ध्येय पुर्ती च्या दिशेने आहे. हे करुन हि दाखवले आहे. केमिकल व रासायनिक खते मुक्त शेती करुन जैविक शेती तारणारी आहे. यातून शेतकऱ्यांची प्रगती साधल्या जाणार आहे. असेही मयांक गांधी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना म्हणाले आहेत.
● हजारो शेतकरी उपस्थित,शेती औजारे, फळे,रोपवाटिकेचे स्टाॅल
: ह्या मेळाव्यास परळी तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते . कान्नापूर जवळ मोहा रोड लगत श्री.संजय आडसूळ यांच्या फार्म मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोफत माती परीक्षण, कंपोस्ट खत निर्मितीसाठी मोफत गोकृपा जैविक द्रव बाॅटल मोफत लाभ मिळाल्याने शेतकरी आनंदीत झाले.