Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्याच्या स्पर्धेसाठी सव्वा कोटीच्या निधीतून दरवर्षी स्पर्धा होणार-अजित पवार, क्रीडा स्पर्धेला उदंड प्रतिसाद

बीड दि.12 (प्रतिनिधी):
जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी च्या वार्षिक क्रिडा स्पर्धेसाठी सव्वा कोटींचा निधी डिपॉझिट करण्यात येणार असून सादर निधीतील वार्षिक व्याजातून दरवर्षी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या सांघिक व वेयक्तिक स्पर्धा घेण्यात येतील असा महत्व पूर्ण घोषणा बीड जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केली.
जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी, अजीत पवार बोलत होते, यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उप मुख्य कार्यकरी अधिकारी(सा.) उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, डॉ .ज्ञानोबा मोकाटे,जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल कल्याण) चंद्रशेखर केकान, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, रोटरी क्लब चे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, सीए जाधव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना अजीत पवार म्हणले, जिल्हा परिषदेत आम्ही असो व नसो, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कायमस्वरूपी क्रिडा स्पर्धा घेण्यासाठी निधीची तरतूद करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी क्रिडा स्पर्धा अयोजनामागची भूमिका विषद केली. प्रास्ताविक भाषणात मुख लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे यांनी, सर्व क्रीडा स्पर्धकांना बहारदार प्रास्ताविकातून प्रोत्साहित केले.
प्रारंभी पोलिस बँड पथकाच्या वाद्याने संचलन करण्यात आले, मुख्यकार्यकारी अधिकारीअजित पवार यांनी, दीप प्रज्वलन करून हिरवा ध्वज दाखवून स्पर्धेला प्रारंभ झाला.
सदर क्रिडा स्पर्धेत कबड्डी, हॉलीबॉल, खो-खो, क्रिकेट या सांघिक खेळात प्रत्येक तालुक्याचा संघ सहभागी आहे, तर वयक्तिक स्पर्धा प्रकारात 100,मीटर,200,मीटर धावणे, गोळा फेक,थाळी फेक, बॅडमिंटन, भालाफेक, आदी खेळाचा समावेश आहे. स्पर्धेत एकूण 1000 हजार खेळाडू सहभागी झाले आहेत.
उदघाटन कार्यक्रमात सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिक्षणाधिकारी(प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, नागनाथ शिंदे, उपशिक्षणाधिकारी अजय बहिर, हिरालाल कराड, विस्तार अधिकारी गौतम चोपडे,तुकाराम पवार,ऋषिकेश शेळके,, जयलाल राजपूत ,शिवलाल राठोड,आदींनी स्वागत केलं.
या वेळी सर्व विभाग प्रमुख गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,आदी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी डॉ विक्रम सारूख, अभिजित तांदळे,वॉर रूमच्या शिक्षकानीं व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन पोलीस कर्मचारी शेळके व बाळासाहेब तळेकर यांनी केले.

Exit mobile version