Site icon लोकाशा-बंब न्यूज

लोटस हॉस्पिटलमध्ये मधुमेह निदान शिबीर

बीड : जागतिक मधुमेह दिनानिमित्त 14 नोव्हेंबर रोजी मोफत मधुमेह निदान शिबीराचे लोटस हॉस्पिटल बीड येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली.
सकाळी 11 ते दुपारी तीनपर्यंत हे शिबीर चालणा असून यात मधुमेह तज्ञ डॉ. अमित ज. काळे, शल्य चिकित्सक डॉ.अशिष भा.गर्जेे, रेडिऑलॉजी तज्ञ डॉ.श्रीनिवास भ. शेळके, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप झुं. सानप, फिजिओथेरपिस्ट डॉ.सुरज मनसबदार हे तपासणी करणार आहेत. रक्तातील जेवणाआगोदर व नंतरची साखर तपासणी, पायातील नसांची मशिनद्वारे तपासणी, तीन महिन्याची रक्तातील साखर तपासणी, डोळ्यांची रेटीनोपॅथी तपासणी, डायबेटीक फुट व जखमांवर उपचार, मधुमेहांमुळे होणारे खांदा व सांधेदुखी तपासणी आणि फिजिओथेरपी आणि आहार मार्गदर्शन करणत येणार आहे. शिवाय केवळ 500 रुपयात मधुमेह रुग्णांसाठी सोनोग्राफी तपासणी करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. त्यासाठी 9881708786, 9881709786, 9881710786 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version