बीड । दिनांक १०।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा आज दिवसभर केज शहरात जंगी जनसंपर्क दौरा पार पडला. शहरात त्यांनी विविध कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटी घेतल्या. उमरी येथे शहीद जवानाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले.
पंकजाताई मुंडे आज दिवसभर दुपारी केजला होत्या. दहिफळ वडमाऊली येथे गदळे कुटुंबियांच्या घरी त्यांनी सांत्वनपर भेट दिली. परळीच्या डाॅ. शालिनीताई कराड यांच्या मातोश्री बाळूताई गदळे यांचे नुकतेच निधन झाले होते, त्यांचे सांत्वन त्यांनी केले. ज्येष्ठ नेते विक्रमबप्पा मुंडे यांच्या देवगांव येथील घरी त्यांनी भेट दिली. विक्रमबप्पा यांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे, त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. विजयकांत मुंडे तसेच ग्रामस्थ व विविध गावच्या सरपंचांनी यावेळी त्यांचं स्वागत केलं. लोकनेते मुंडे साहेबांवर या भागातील जनता अलोट प्रेम करते, कितीही संघर्ष करावा लागला तरी त्यांच्या जनसेवेचा वारसा अखेरपर्यंत जपणार असून कायम तुमच्या ऋणात राहणार आहे. या भागातील शेतकऱ्यांचा विम्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे पंकजाताईंनी यावेळी सांगितले.
पंकजाताईंनी या दौऱ्यात रमाकांत मुंडे, तालुकाध्यक्ष भगवान केदार, रामकृष्ण काका घुले, डाॅ. वासुदेव नेहरकर, टाकळीचे घुले आदींच्या घरी भेट दिली. दौऱ्यात अनेक नागरिकांनी त्यांचेसमोर आपल्या समस्या देखील मांडल्या, त्याचे निराकरण त्यांनी केले.
उमरीत जवानाच्या कुटुंबियांचे सांत्वन
भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले उमरी येथील जवान मच्छिंद्र मुळे यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. पंकजाताईंनी आज त्यांच्या गावी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली व सांत्वन केले.