Site icon लोकाशा-बंब न्यूज

आ. प्रकाशदादा सोळंके यांची सहकारी साखर कारखाना संघ,मुंबईच्या संचालक पदी बिनविरोध निवड

माजलगाव दि १० (बातमीदार)
माजलगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री आणि लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक मार्गदर्शक मा. आ. श्री. प्रकाशदादा सोळंके यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि, मुंबई च्या संचालक पदावर सर्वसाधारण मतदार संघातुन बिनविरोध निवड झालेचे आज दिनांक १०/११/२०२२ रोजी निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई (१) शहर यांनी जाहीर केले आहे. नुकतीच मागील महिन्यात महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबईच्या सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत सर्वसाधारण मतदार संघातुन मा. आ. श्री. प्रकाशदादा सोळंके यांची बिनविरोध निवड करणेत आली.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या माध्यमातुन सहकारी साखर कारखान्याची गुणवत्तावाढ, शेतकरी व साखर उद्योगांच्या समस्या, कारखान्यास वित्त पुरवठयातील व्यवहारीक अडचणी, साखर निर्यातीचे प्रश्नासंबंधी केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे काम महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघामार्फत केले जाते. मा. आ. श्री. प्रकाशदादा सोळंके यांच्या निवडीबद्यल कारखान्याचे चेअरमन श्री. धैर्यशीलकाका सोळंके, कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद त्याचबरोबर कार्यकारी संचालक श्री. एम. डी. घोरपडे आणि सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचेकडुन अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version