Site icon लोकाशा-बंब न्यूज

जुन्या मोंढ्यातील अंतर्गत सिमेंट रस्ते व नाली बांधकाम कामास आज प्रत्यक्ष सुरवात…

*महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत टप्पा क्र.02 मधील आज पेठ बीड भागातील जुन्या मोंढ्यामधील अंतर्गत सिमेंट रस्ते व नाली बांधकाम या कामास आज प्रत्यक्ष सुरवात झाली. याप्रसंगी युवा नेते डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी न.प.मुख्याधिकारी श्री.उमेश ढाकणे यांच्यासह सहकाऱ्यांसमवेत भेट देत पाहणी केली.

शहराच्या व्यापारी केंद्राच्या दृष्टीने जुना मोंढा अत्यंत महत्वाचा मानला जातो. येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा व सामान्य नागरिकांची सतत वर्दळ असल्याने रस्त्याचे काम व्यापारी बांधवांशी चर्चा करून सुरू करण्यात आले आहे. या होत असलेल्या दर्जेदार कामामुळे व्यापारी बांधव व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

यावेळी ज्येष्ठ उद्योजक बाबुशेठ लोढा, मा.उपनगराध्यक्ष अमृत (काका) सारडा, नगरसेवक अमर नाईकवाडे, फारुख पटेल, बाळासाहेब गुंजाळ,राणा चौव्हान, बहिरवाडीचे सरपंच बाजीराव बोबडे,जवाहरसेठ काकंरिया, अशोक शेटे, मदन अग्रवाल, बद्रिनारायण मानधने, गंगाभिषण करवा, संजय नहार, प्रवीण बोरा, रमेश पगारिया, रमेश कात्रेला, अतुल मौजकर, सुभाष संचेती, संजय अग्रवाल, निलेश खिंवसरा, पांडूरंग जोगदंड, गोविंद तोष्णीवल, विनोद पिंगळे, प्रदीप खिंवसरा, निलेश लोढा, अजय लड्डा, सतिश डुंगरवाल, नागेश क्षीरसागर, आनंद मुगदिया, आकाश नहार, लक्ष्मण शेनकुडे, ईश्वर धनवे, फामजी पारीख, रामदास सरवदे, विशाल मोरे, महादेव वाघमारे, विकास यादव, शाम भागवत, सौ.संगीताताई वाघमारे, रमेश वाघमारे, संभाजी काळे यांच्यासह व्यापारी बांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version