बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : बीडचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांची औरंगाबाद ग्रामीणला अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात बीडला उत्तररित्या काम केलेले आहे, आता त्यांची बदली औरंगाबाद ग्रामीणला करण्यात आली आहे. यापुर्वी त्यांनी औरंगाबाद याही ठिकाणी कर्तव्य बजावलेले आहे. आता त्यांच्या जागी बीडला महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांची बीड अप्पर पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या पाठोपाठ बीडचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांची भोकर येथून वर्धा याठिकाणी अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच राज्य गुप्तवार्ता उपआयुक्त तथा बीडचे तात्कालिन पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांची मुंबई शहर च्या पोलिस उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दिक्षीतकुमार गेडाम यांचीही मुंबई शहरच्या उपायुक्त नियुक्ती करण्यात आली आहे. आज खाकीतील 104 अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
खाकीतील 104 अधिकार्यांची खांदेपालट, सुनिल लांजेवार यांची औरंगाबाद ग्रामीणला बदली, सचिन पांडकर आता बीडचे नवे एएसपी, कबाडे यांची वर्धा, पारसकर आणि दिक्षीतकुमार गेडाम मुंबईचे नवे पोलिस उपायुक्त
