परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022 – 23 च्या तयारीला वेग आला आहे. दूरूस्तीची कामे गतीने सुरू असुन आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात रोलर पूजन करण्यात आले.
वैद्यनाथच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यातील कामे वेगाने सुरू झाली आहेत. पंधरा दिवसांमध्ये कारखान्याचे गाळप सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने युध्द पातळीवर कामे सुरू आहेत. आज मान्यवरांच्या उपस्थितीत रोलर पूजन करण्यात आले. कारखान्याचे संचालक व्यंकटराव कराड व गणपतराव बनसोडे यांच्या हस्ते रोलरची विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी कारखान्याच्या विविध खात्याचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामास लवकरच सुरूवात होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंधरा दिवसात वैद्यनाथ कारखान्यातून उसाच्या गाळपाला सुरुवात होणार, गाळपाच्या तयारीला आला वेग, उत्साहात झाले रोलर पूजन
