Site icon लोकाशा-बंब न्यूज

अखेर आरटीओतील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल निलंबीत; बनावट पेपर प्रकरण भोवले


बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या काही वर्षापासून गैरप्रकार होत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. त्यात मागे एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. यात येथील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल यांनी चक्क जुन्या आरटीओंच्या सह्या करुन एका जेसीबीचे बोगस कागदपत्र तयार केले होते. या प्रकरणी बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याची गंभीर दखल घेऊन परिवहन आयुक्त यांनी सुरेखा डेडवाल यांच्या निलंबनाचे आदेश शुक्रवारी काढले आहेत.

Exit mobile version