Site icon लोकाशा-बंब न्यूज

बनावट देशी दारूचा अड्डा एलसीबीने केला उध्वस्त, दारू तयार करणाऱ्याला ठोकल्या बेड्या, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त


बीड, मा.पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी बीड जिल्हयातील अवैध धंद्याची माहिती घेवून केसेस करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. त्यानूसार दिनांक 02/11/2022 रोजी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सोलापूर ते धुळे रोड बीड बायपास लगत शिदोड शिवारात एका पत्र्याचे शेडमध्ये एक इसम विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारु रसायनचा वापर करुन स्वत:चे फायद्यासाठी विक्री करण्याचे उद्येशाने बनावट दारु तयार करुन देशी दारुचे बॉटलमध्ये भरुन तयार करीत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळालेवरुन पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रात्री 23.30 वा. सापळा रचून छापा मारला असता इसम नामे सोनाजी अशोक जाधव वय 28 वर्षे रा.गांधीनगर, पेठ बीड हा एका पत्र्याचे शेडमध्ये आरोग्यास हानीकारक आहे असे माहित असतांना हानीकारक रसायनाचा वापर करुन बनावट देशी दारु तयार करुन ती देशी दारुच्या बॉटलमध्ये भरुन ती ओरिजनल आहे असे भासवून विक्री करण्याचे उद्देशाने बनावट देशी दारुचे साहित्य व बनावट तयार देशी दारु असा एकूण 2,94,520 /- रु.चा माल मिळून आल्याने जप्त करुन त्याचेविरुध्द पोलीस ठाणे, बीड ग्रामीण येथे गु.र.नं. 341/2022 कलम 328 भादंवि सह कलम महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे सुधारीत 2018 चे कलम 12,13,65(अ),(ब),(क),(ड),(ई),(फ), 80 व 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून बीड ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Exit mobile version