Site icon लोकाशा-बंब न्यूज

डीसीसीची धुरा आता जिल्हा उपनिबंधकांच्या हाती, सहकार मंत्र्यांनी बीडच्या जिल्हा बँकेवरील प्रशासक मंडळ बदलले


बीड, दि. 2 (लोकाशा न्यूज) : राज्याचे सहकार मंत्री अतूल सावे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी येथील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील प्रशासक मंडळ बदलले आहे. आता प्रशासक मंडळाची जबाबदारी अप्पर आयुक्त अविनाश पाठक यांच्याऐवजी बीडचे जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल 11 जागा रिक्त राहिल्याने दोन वर्षांपूर्वी या बँकेवर अधिकार्‍यांचे प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेमण्यात आले होते. अप्पर आयुक्त अविनाश पाठक यांच्या नेतृत्वाखाली प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते, मात्र या बँकेवरील प्रशासक मंळडाचा पदभार माझ्याकडून काढून घ्यावा, असे लेखी पत्र पाठक यांनी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्यामार्फत सरकारला दिले होते, असे असतानाही मागच्या दहा दिवसांपुर्वीच अविनाश पाठक आणि उपनिबंधक अशोक कदम यांच्या प्रशासक मंडळाला मुदतवाढ दिली होती. आता राज्य सरकारने जिल्हा बँकेच्या प्रशासक मंडळाची पुर्नर्चना केली असून जिल्हा उपनिबंधक समृत जाधव आणि जिल्हा विशेष लेख परीक्षक बी. यु. भोसले यांचे प्रशासक मंडळ बँकेवर नेमले आहे.

Exit mobile version