Site icon लोकाशा-बंब न्यूज

गेवराईच्या तरुणाचा जामखेड जवळील साकत रोडवर टनक हत्याराने केला खुन, अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

जामखेड जवळील साकत रोडवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास एका ३० वर्षीय तरुणास टनक हत्याराने मारहाण करुन खुन केला. सदरची घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश शिवाजी वारे वय ३० वर्ष राहणार, संगम जळगाव, तालुका- गेवराई ,जिल्हा, बीड आसे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की काल रात्री च्या सुमारास मयत गणेश वारे यास जामखेड जवळील साकत रोडवरील धोत्री गावच्या हद्दीत जुन्या कॉटन जिनींग मिलच्या गेटसमोर कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने कशाच्या तरी कारणावरून टनक हत्याराने त्याच्या पोटावर, पाठीवर, छातीवर व डोक्यावर तसेच हता पायावर जबर मारहाण करून खुन करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच कर्जत चे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे व जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.

सदरची घटना आज सकाळी उघडकीस आली गणेश याचा मृतदेह जाग्यावरच पडुन होता. याबाबत ची माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस सचिन पिरगळ यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोनवर दिली. त्यानंतर त्यांना आपली रुग्णवाहिका घेऊन येण्यास सांगितले या नंतर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आपले मित्र संतोष सुराणा यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले सदरचा मृतदेह आपल्या रुग्णवाहिकेत आणला यावेळी पो कॉ संदीप राऊत संग्राम मेजर, सचिन गाडे, आकाश घागरे, आदींनी मदत केली.

जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कुंडलिक आवचरे यांनी दुपारी सदर मृतदेहाचे शवविच्छेदन केल्या नंतर सदरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत गणेश वारे याचे बीड जिल्ह्य़ातील गेवराई तालुक्यातील संगम जळगाव हे मुळ गाव आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून तो बाहेच फीरत होता. गेल्या पाच वर्षांत त्याचा घरशांशी संपर्क नव्हता.
तो जामखेड कडे का व कशासाठी आला तसेच त्याला कोणी व कोणत्या कारणाने मारले याची उद्याप माहीती मिळु शकेलेली नाही.

या प्रकरणी मयत गणेश वारे याचे वडील शिवाजी मारुती वारे रा. संगम जळगाव यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस सापोनी सुनील बडे हे करत आहेत.

Exit mobile version