बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : बीडमधील कुटे उद्योग समूह गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त बीड जिल्ह्यातील उपेक्षितांसोबत साजरी करत आहे. यावर्षीही प्रत्येक पालावर, वस्त्यावर जावून चार हजार कुटुंबाला दिवाळीचे साहित्य आणि फराळाचे वाटप केले. कुटे उद्योग समुहाचे हे काम अविरत चालू आहे. त्यामुळे कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या या सामाजिक कामाचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.
बीडमधील कुटे उद्योग समुह पोहचला
वाड्या, वस्त्यावर;
चार हजार कुटुंबांची दिवाळी केली गोड,
सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या सामाजिक
कामाचे कौतूक करावे तेवढे कमीच
