Site icon लोकाशा-बंब न्यूज

डॉ. सुरेश साबळे ईज कायम, प्रभारी शब्द निघाला, पर्मनंट कारभारी


लोकाशा न्यूज
माजलगावचे आरोग्य अधिकारी म्हणून असलेले डॉ सुरेश साबळे हे बीड जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी सिव्हील सर्जन होते , काल राज्य सरकारने त्यांना कायम केल्याचा आदेश काढला , त्यांची बदली झाल्यानंतर बीड मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकआंदोलन उभे करून त्यांची बदली रद्द करण्याची मागणी लाऊन धरली होती , याच आंदोलनाला प्रतिसाद म्हणून शिंदे सरकारने बीडला हक्काचे सिव्हील सर्जन दिले असून यामुळे जिल्हाभरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .
सिव्हील सर्जन डॉ सुरेश साबळे आता बीड जिल्हा रुग्णालयात प्रभारी नाही तर कायमचे कारभारी म्हणून सेवा देणार आहेत . त्यांच्या बदली संदर्भातले किंतु परंतु संपले असून त्यांची कायम नेमणूक जिल्ह्याला दिलासादायक आहे , कोरोनाच्या शेवटच्या लाटेत आणि नंतरच्या काळात बाह्यरुग्ण सेवा प्रचंड तत्पर आणि कर्तव्यदक्ष करताना त्यांच्यातल्या सुकानुधारी नेहमीच सिद्ध झालेला आहे , त्यांच्या कायम सेवेसाठी जिल्हाभरात लोक आंदोलन उभे राहिले आणि शेवटी शासनाने लोकांच्या भावना लक्षात घेऊन हक्काचा सिव्हील सर्जन जिल्ह्याला काल दिले .

Exit mobile version