ओला दुष्काळ असो वा कोरडा दुष्काळ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या माथ्यावरच लिहिला आहे.हातातोंडाशी आलेलं पिकाची अतिवृष्टीमुळे माती झाली आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत.
माजलगाव मतदारसंघातील मोहखेड,हिंगणी,आमला,कान्नापूर,देवठाणा,चिखली परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीसह,रस्ते,पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे.संपूर्ण परिस्थितीची तहसीलदार यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली.शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याबाबत सरकारने तातडीने पाऊले उचलत शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी .