Site icon लोकाशा-बंब न्यूज

अन् पंकजाताई मुंडेंनी हायवे वरच्या हाॅटेलात घेतला मिसळ-पाव चा आस्वाद ! हाॅटेल चालकाची केली आस्थेवाईकपणे चौकशी ; स्वतः चहा देखील बनवला

बीड ।दिनांक १९।
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याप्रमाणेच सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांचेशी एकरूप होण्याची किमया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्यामध्येही असल्याचे यापूर्वी अनेक वेळा दिसून आले आहे. आज पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील एका छोटया हाॅटेलमध्ये सर्व सामान्य ग्राहकांसोबत बसून त्यांनी मिसळ-पावचा आस्वाद घेतला आणि स्वतः चहाही तयार केला यावेळी हाॅटेल चालकाची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशीही केली.

पंकजाताई मुंडे आज सकाळी औरंगाबादहून बीडला जाण्यासाठी निघाल्या असता बीड हायवे वर रस्त्यात असलेल्या हाॅटेल देवगिरी समोर त्यांच्या वाहनाचा ताफा थांबला. पंकजाताईंना पाहताच हाॅटेल चालक दिपक शिंदे यांनी त्यांचं अगत्यपूर्वक स्वागत केलं. यावेळी हाॅटेल मध्ये बसलेल्या सर्व सामान्य ग्राहकांना त्यांच्या येण्याचं कुतूहल वाटलं. हाॅटेल चालकाच्या आग्रहावरून पंकजाताईंनी मिसळ-पाव आणि पोहयाचा आस्वाद घेतला. एवढंच नव्हे तर स्वतः चहा तयार करून घेतला व सोबतच्या कार्यकर्त्यांनाही दिला. यावेळी हाॅटेल चालक तसेच इतर ग्राहकांना त्यांचेसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. पंकजाताईंना पाहताच हाॅटेलमध्ये बरीचशी गर्दीही जमली. सर्वांनी त्यांचेसोबत फोटो काढले. पंकजाताईंनी देखील सर्वांसोबत मनमोकळा संवाद साधला.
••••

Exit mobile version