Site icon लोकाशा-बंब न्यूज

पत्नी व मुलाची हत्या करून पोलिसांना केला फोन;माजलगाव खळबळ

माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथील काळे वस्तीवर राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याची पत्नी व मुलगा याची हत्या केली व घटनेची माहिती पोलिसांना दिली. सदर घटना पहाटे तीन वाजता घडली.
मंजरथ पासून जवळच असलेल्या काळज वस्तीवर वास्तव्यास असलेले पांडुरंग दोडतले यांनी त्यांची पत्नी
लक्ष्मी पांडुरंग दोडतले व मुलगा पिल्या पांडुरंग दोडकले या दोघांची झोपेतच तीक्ष्णहत्याराणे हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पत्नी व मुलाची हत्या केल्यानंतर पांडुरंग दोडतले यांनी ग्रामीण पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
पहाटेच घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन आरोपी पांडुरंग दोडतले यास अटक केली. या घटनेने मंजरथ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटना कशामुळे घडली याचा पोलीस तपास करत आहेत.

Exit mobile version