बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेचे काम कोणतेही असो ते काम गतीने मार्गी लावण्याचे काम सीईओ अजित पवार हे करत आहेत. त्याअनुषंगानेच 262 योजनांचे एकत्रित टेंडर काढावे, असा प्रस्ताव पवार यांनी एमजीपीकडे पाठविला होता, केवळ दहा दिवसात हे प्रस्ताव तयार करून एमजीपीकडे पाठविण्यात आले होते, सीईओंनी पाठविलेल्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेवून एमजीपीनेही 262 योजनांचे टेंडर काढले आहे. दरम्यान यासाठी सीईओंनी घेतलेल्या मेहनतीमुळे 275 गावातील जलजीवनच्या कामांचा प्रश्न मार्गी खर्या अर्थाने मार्गी लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवनची योजना हाती घेतलेली आहे, या योजनेतून त्यांना नळाव्दारे घराघरात पाणी पोहचविण्याचे काम करायचे आहे, जिल्ह्यात या योजनेतून 1367 गावांमध्ये घराघरात नळ बसणार आहेत. मोदींच्या या कल्याणकारी योजनेला गती द्यावी, या अनुषंगाने जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनीही प्रशासनाला सुचना केलेल्या आहेत. याअनुषंगानेच सीईओ अजित पवार हे या योजनेचे काम गतीने करत असून कामाला गती देण्यासाठी 262 योजनांचे एकत्रित टेंडर काढावे, असा प्रस्ताव त्यांनी एमजीपीकडे पाठविला होता, विशेष म्हणजे पाठविण्यात आलेला हाच प्रस्ताव पवार यांच्या सुचनेनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप काकडे यांनी केवळ दहा दिवसांमध्ये तयार केला होता, त्यावर एमजीपीने थोडाही विलंब न करता सदर 262 योजनांचे टेंडर काढले आहे. यामुळे जिल्ह्यातील 275 गावातील जलजीवनच्या कामांचा प्रश्न खर्या अर्थाने मार्गी लागला आहे. यातून सीईओ अजित पवार यांची काम करण्याची गती किती मोठी आहे, आणि ही गती जिल्ह्यासाठी कशी फायद्याची ठरत आहे हेच यातून जाणवते.
जलजिवनच्या 262 योजनांचे एमजीपीने एकत्रित टेंडर काढले, 275 गावातील कामांचा प्रश्न सीईओंनी दहा दिवसात मार्गी लावला
