Site icon लोकाशा-बंब न्यूज

इनामी जमिनीच्या वादातून एकाची हत्या करणारे आरोपी जेरबंद


परळी वैजनाथ दि ४ ( लोकाशा न्यूज ) :- इनामी जमिनीच्या मालकी वरून एका इसमाची नातेवाईकांनीच हल्ला करून हत्या केली असून मयताची पत्नी आणि मुलगा मारहाणीत गंभीरित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मारुती मुंडे यांनी त्वरित गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या मुसक्या आवळुन जेरबंद केले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आज भर दुपारी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत इनामी जमिनीच्या मालकीवरून मयताच्या नातेवाईकांनीच जोरदार हल्ला करीत जबर महाराण केली. मारहाणीत शेख इलियास इब्राहिम वय ५० यांचा जागीच मृत्यू झाला तर मयताची पत्नी शेख हजरबी व मुलगा शेख अरबाज हे गंभीरित्या जखमी झाले आहेत जखमीवर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ह्या प्रकरणी मयताचा मुलगा शेख अब्दुल खादर शेख इलियास वय २८ वर्षे व्यवसाय मजुरी रा. इस्लामपुरा बंगला परळी वैजनाथ यांने परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांना झाला प्रकार सांगितला व रितसर फिर्यादी दिली की, त्याचे व मयत वडील शेख इलियास इब्राहिम वय ५० वर्षे, आई शेख हजराबी यांचे भावकीतील नातेवाईक मंजूर कासिम शेख, नदी मंजूर शेख, युनूस कासिम शेख, शेख जहूर शेख कासिम, शेख अनिस शेख कासिम व इतरांशी व बोर्डाच्या शेतीच्या मालकी वरून आज रोजी दुपारी ३ च्या सुमारास भांडण झाले. भांडणात आरोपींनी फिर्यादीचे वडील हे मयत झाले. तर आई नामे शेख हजराबी व दुसरा मुलगा नामे शेख अरबाज हे जखमी झालेली आहेत.
मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर २५०/२०२२ कलम ३०२, ३२४, ५०४, ५०६ १४३,१४७,१४८,१४९ भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळुन जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती श्रीराम मुंडे हे करीत आहेत. घटना स्थळावर पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी भेट दिली असून, अंबाजोगाई विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी भेट दिलेली आहे.
( चौकट )
“आरोपींनी मयताच्या बापाचीही केली होती हत्या”
इनामी जमिनीच्या वादातून आज अटक करण्यात आलेल्या आरोपींनी १९८३ सिली आज मयत झालेल्या शेख इलियास इब्राहिम याच्या बापाचीही हत्या केली होती. या प्रकरणी आरोपींवर त्यावेळी गुन्हाही दाखल करण्यात येऊन जेरबंद करण्यात आले होते. मात्र सदर घटनेतून आरोपी निर्दोष मुक्त झाले. आज त्याच आरोपींनी त्यावेळी मयत झालेल्या इसमाच्या मुलाची हत्या केली. यावरून सदर प्रकरणातील आरोपी किती कठोर आणि निर्दयी आहे हे सिद्ध होते.

Exit mobile version