Site icon लोकाशा-बंब न्यूज

पीएफआयचे बीडमधील कार्यालय सील, तर जिल्हाध्यक्षसह एकास 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

कोठडी

बीड :पीएफआय या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर बुधवारी रात्री बीडमधील कार्यालय महसूल विभागाने सील केले. तर बीड शहर पोलिसांनी जिल्हाध्यक्षासह अन्य एकास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पीएफआय या संघटनेच्या बीड येथी माजी जिल्हा अध्यक्षास एटीएसने अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बीडमध्ये संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते.

दरम्यान केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घालताच बीड शहर पोलिस स्टेशनचे रवी सानप व सहकर्यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोज मोमीन व कामरान खान यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

तर दुसरीकडे बीड शहरातील जुना बाजार भागातील संघटनेचे कार्यालय महसूल विभागाने सील केले. यावेळी तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह महसूल व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version