बीड, दिनांक 15/09/2022 रोजी मा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमी मिळाली की सुगंधी तंबाखू ने भरलेला एक आयशर टेम्पो क्रमांक एम एच 44 ए यु 7322हा हा मांजरसुंबा कडून केज मार्गे लातूरकडे जात आहे अशी माहिती मिळाल्यावर मा सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमावत साहेब यांनी त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार यांना वरील माहिती कळऊन सदर वाहनाची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केल्याने त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार यांनी सदरचा टेम्पो दिनांक 15 /9/ 2022 रोजी 21 30 वाजता शिक्षक कॉलनी केज येथे ताब्यात घेऊन चालकास नावा विचारले असता त्यांनी त्यांचे नाव नंबर 1, प्रदीप बळीराम सूर्यवंशी 2,सुमंत व्यंकटराव माने दोन्ही राहणार हाडोळी तालुका निलंगा जी लातूर असे सांगितले त्याचे ताब्यातील आयशर टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोमध्ये 80 पोते सुगंधी तंबाखू चा माल किमती 13 44000 रुपये व आयशर टेम्पो किंमत 3200000 रुपये आता एकूण 44, 45,000 रुपयाचा माल जप्त करून सदरची तंबाखू अन्न प्रशासन विभागाचे अधीकारी महेंद्र गायकवाड यांच्याकडून खात्री करून अन्न व प्रशासन अधिकारी महेंद्र गायकवाड फिर्यादवरून पोलीस ठाणे केज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मा, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोउपनी मनोज कुलकर्णी ,सह फौजदार मुकुंद ढाकणे ,बाबासाहेब बांगर ,बालाजी दराडे, देसाई घुले ,राजू वंजारे ,रामहरी भंडाणे ,संजय टूले यांनी केली आहे