Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ; विविध विषयांवर झाली चर्चा

मुंबई ।दिनांक १५।
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचे पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे .

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पंकजाताई मुंडे यांनी भेट घेऊन विविध विकासात्मक कामाबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातही पुरेसा वेळ देत पंकजाताई मुंडे यांचे मुद्दे व विषयांवर सकारात्मक चर्चा केली. त्याचप्रमाणे काही प्रश्न तात्काळ मार्गी लावले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीत अनेक सकारात्मक विषयावर चर्चा झाल्याचे ट्विट या भेटीनंतर पंकजाताईंनी केले आहे.
“अत्यंत व्यस्त रूटीन मध्ये असताना देखील मुख्यमंत्र्यांची
निवांत भेट झाली… राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या मुद्यावर त्यांनी सकारात्मकता दाखवली .. लागलीच कार्यवाहीचे आदेश ही दिले…” असं ट्विट त्यांनी केलं आहे.
••••

Exit mobile version