बीड, दि.15 (लोकाशा न्युज) ः नवे सरकार स्थापन झाल्यानंतरही अद्याप पालकमंत्री घोषित न झाल्याने बीडसह इतर जिल्ह्यांना सध्या पालकमंत्री नाहीत. जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ध्वजारोहन करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढून काही मंत्र्यांवर जिल्ह्याचे मुख्य ध्वजारोहन करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार दि.17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी बीड जिल्ह्याचे मुख्य ध्वजारोहन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मंत्री संदिपान भुमरे फडकवणार बीडचा झेंडा
