Site icon लोकाशा-बंब न्यूज

शिवसेनेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते प्रा.सुनील धांडे यांनी पुन्हा बांधले शिवबंधन‌

मुंबई दि १४ :- शिवसेनेचे बीडचे माजी आमदार तथा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा सुनील धांडे यांनी आज पुन्हा शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्याच हस्ते पुन्हा प्रा धांडे यांनी आज मुंबईत केला शिवसेनेत प्रवेश. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे ह्याही उपस्थित होत्या. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बीड जिल्ह्यातील पक्षाच्या पुन्हा रणनीतीवर प्रा सुनील धांडे यांनी पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. माननीय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आपण पुन्हा तितक्याच ताकदीनिशी पक्ष कार्यासाठी जोमाने कार्याला लागू अशी प्रतिक्रिया प्राध्यापक सुनील धांडे यांनी पक्ष प्रवेशानंतर दिली.

Exit mobile version