Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यातील 580 ज्येष्ठ नागरिकांना सकाळी मिळणार डिजीटल ओळखपत्र, ‘सावली उपक्रमास एसीईओंनी दिली गती


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा परिषदेने ‘थोडेसे मायबापासाठी पण’ अंतर्गत सावली उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमाला एसीईओ वासूदेव सोळंके यांनी प्रचंड प्रमाणात गती दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मार्गी लावून त्यांना मोठा आधार दिला जात आहे. त्याअनुषंगानेच पहिल्या टप्प्यात आज जिल्ह्यातील 1035 पैकी 580 ज्येष्ठ नागरिकांना डिजीटल ओळखपत्राचे वाटप केले जाणार आहे. उर्वरित 455 ज्येष्ठ नागरिकांना दुसर्‍या टप्प्यात डिजीटल ओळखपत्राचे वाटप केले जाणार आहे. हा कार्यक्रम बीड जिल्हा परिषद, सकल जैन समाज, इंडि मेडीकल असो, फार्मा असो, रोटरी क्लब, व्यापारी असो यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सकाळी साडे दहा वाजता शहरातील अमृत मंगल कार्यालयात होणार आहे. यावेळी सीईओ अजित पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना डिजीटल ओळखपत्राचे वाटप केले जाणार आहे. यावेळी एसीईओ वासूदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर मोकाटे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेख रौफ, जैन समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक लोढा, इंडियन मेडिकलचे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर, फार्मा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरूण बरकसे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहणी, रोटरी क्लबचे जिल्हाध्यक्ष परमेश्‍वर जाधव, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांची उपस्थिती राहणार आहे.

Exit mobile version