Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळीत एएसपी कविता नेरकरांच्या पथकाची छापेमारी, गुटख्यासह साडे चार लाख रूपयांचा मुद्देमाल पकडला, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


परळी, दि. 13 (लोकाशा न्युज) : परळी शहरातील विद्यानगर भागात एका ठिकाणी गुटख्याने भरलेला छोटा हत्ती टेम्पो अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने छापा मारून पकडला या पथकाकडून 4 लाख 59 हजार 803 रुपयाचा गुटखा वाहनासह जप्त केला आहे. ह्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत परळी शहर पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहिती अशी की, परळी शहरातील विद्यानगर भागात एका वाहनातून विक्रीसाठी गुटखा आणण्यात आल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांना मिळताच सोमवार दि. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता अनिल दौंड, उपनिरीक्षक सिंगाडे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक चाँद मेंडके, पोना. देवकते, पोशि. राऊत, खंदारे व इतर दोन खाजगी व्यक्तींनी छापा टाकला. यात महिंद्रा जितो टेम्पो मध्ये राजनिवास पान मसाला, बाबा पानमसाला, रत्ना सुगंधीत तंबाखू,विमल पानमसाला, आर. एम. डी. गुटखा, बाबा तंबाखू असा 59803 रुपयांचा गुटखा व गुटखा विक्रीसाठी आणलेले वाहन असा एकुण 4 लाख 59 हजार 803 रुपयांचा गुटखा जप्त करत दोघाविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 328, 272, 273 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Exit mobile version