Site icon लोकाशा-बंब न्यूज

सख्या मामानेच केली चार वर्षीय भाच्याची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या

परळी वैजनाथ दि ११ ( लोकाशा न्युज ) :- परळी तालुक्यातील नागापूर येथील कॅम्पवर राहत असलेल्या चार वर्षीय बालकाची सख्या मामानेच निर्घुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुमार कार्तिक विकास करंजकर वय ०४ वर्षे राहणार लाडेगाव पोलीस स्टेशन युसुफ वडगाव तालुका केज हा मुलगा त्याची आई नामे सुरेखा विकास करंजकर याचेसह काल दिनांक १०/९/२२ रोजी तिचा भाऊ /आरोपी नामे सैनिक लक्ष्मण चिमणकर वय २७ वर्षे राहणार नागापूर गायरान जमिनीवर हा त्याची आईला त्रास देत होता म्हणून बहीण ही माहेरी आली होती. तिने आरोपी भावाला काल रात्री भरपूर समजावून सांगितली. दोघा बहिण भावात भांडण झाले. त्याचा राग मनात धरून आरोपीने पहाटेच बहिणीच्या मुलाचा/ भाच्याचा कुमार कार्तिकचा धारदार हत्याराने गळ्यावर व मानेवर वार करून खून केला आहे अशी प्राथमिक माहिती आहे.
मुलगा ओरडल्यामुळे आईने त्याला तात्काळ सरकारी दवाखाना परळी ,त्यानंतर सरकारी दवाखाना अंबाजोगाई व त्यानंतर सरकारी दवाखाना लातूर येथे उपचार कमी घेऊन गेली. परंतु मुलगा वाचू शकला नाही. आरोपी मामाला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावर आम्ही व पोलीस स्टेशन परळी ग्रामीण चा स्टॉप हजर आहे. अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम सौ नेरकर अंबाजोगाई यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून,पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अधिकारी पीएसआय पोळ हे करीत आहेत.

Exit mobile version