Site icon लोकाशा-बंब न्यूज

थेट सरपंचपदासह 1 हजार 166 ग्रामपंचायतींसाठी
13 ऑक्टोबरला मतदान, 14 ऑक्टोबरला मतमोजणी


मुंबई, दि. 7 (लोकाशा न्यूज) : राज्यातील विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान तर दुसर्‍या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे.
संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे 24 आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी दिली.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणार्‍या
ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या:
ठाणे : कल्याण- 7 , अंबरनाथ- 1 , ठाणे- 5 , भिवंडी- 31 , मुरबाड- 35 आणि शहापूर- 79, पालघर :डहाणू- 62 ,
विक्रमगड- 36 , जव्हार – 47 , वसई- 11 , मोखाडा- 22 , पालघर- 83 , तलासरी- 11 आणि वाडा- 70
रायगड : अलिबाग- 3 , कर्जत- 2 , खालापूर- 4 , पनवेल- 1 , पेण- 1 , पोलादपूर- 4 , महाड- 1 , माणगाव-
3 आणि श्रीवर्धन- 1 रत्नागिरी: मंडणगड- 2 , दापोली- 4 , खेड- 7 , चिपळूण- 1 , गुहागर- 5 , संगमेश्वर- 3 ,
रत्नागिरी- 4 , लांजा- 15 आणि राजापूर- 10 . सिंदुदुर्ग: दोडामार्ग- 2 देवगड- 2 . नाशिक: इगतपुरी- 5 ,
सुरगाणा- 61 , त्र्यंबकेश्वर- 57 आणि पेठ- 71 नंदुरबार: अक्कलकुवा- 45 , अक्राणी- 25 , तळोदा- 55 आणि
नवापूर- 81 . पुणे: मुळशी- 1 ,मावळ- 1 . सातारा: जावळी- 5 , पाटण- 5 आणि महाबळेश्वर- 6 .
कोल्हापूर: भुदरगड- 1 , राधानगरी- 1 , आजरा- 1 आणि चंदगड- 1 . अमरावती: चिखलदरा- 1 . वाशीम:
वाशीम- 1 नागपूर: रामटेक- 3 , भिवापूर- 6 आणि कुही- 8 . वर्धा: वर्धा- 2 आमी आर्वी- 7, चंद्रपूर: भद्रावती –
2 , चिमूर- 4 , मूल- 3 , जिवती- 29 , कोरपणा- 25 , राजुरा- 30 आणि ब्रह्मपुरी- 1 . भंडारा: तुमसर- 1 ,
भंडारा- 16 , पवनी – 2 आणि साकोली- 1 . गोंदिया: देवरी- 1 , गोरेगाव- 1 गोंदिया- 1 , सडक अर्जुनी- 1 आणि
अर्जुनी मोर- 2 . गडचिरोली: चामोर्शी- 2 , आहेरी- 2 , धानोरा- 6 , भामरागड- 4 , देसाईगंज- 2 ,
आरमोरी-2 , एटापल्ली- 2 आणि गडचिरोली- 1 . एकूण- 1 ,166 .

Exit mobile version