Site icon लोकाशा-बंब न्यूज

20 सप्टेंबरपासून जिल्ह्यात नरेगाची कामे सुरू होणार, गेवराईच्या आढावा बैठकीत सीईओ अजित पवारांनी महत्वाचा निर्णय घेतला


गेवराई, दि. 6 (लोकाशा न्यूज) : पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील नरेगाची कामे बंद झाली होती, आता येत्या 20, 21 सप्टेंबरपासून जिल्ह्यात नरेगाची कामे गतीने सुरू करण्यात येणार आहेत. असा निर्णय सीईओ अजित पवार यांनी काल गेवराई येथे झालेल्या आढावा बैठकीत घेतला आहे. सीईओंच्या या एका निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील अनेकांचे भले होणार आहे.
गेवराई पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेवून विविध विभागातील अधिकार्‍यांना चांगली कामे करा अशा सुचना दिल्या. गेवराई तालुक्यातील सर्व सरपंच तसेच विविध विभागाचे अधिकारी यांची पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात बैठक घेवून ग्रामपंचायत भवन, पाणंद रस्ते, शाळा खोल्या , अंगणवाडी खोल्या, व तसेच रोहयोच्या सर्व कामाबाबत कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केले. सर्वात महत्वाचे म्हणजे येत्या 20, 21 सप्टेंबरपासून नरेगाची कामे सुरू करण्यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय जाहिर केला आहे. त्यांच्या या एका निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील अनेकांना मोठा फायदा होणार आहे. या आढावा बैठकीला तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, गटविकास अधिकारी कांबळे, डॉ.सचिन सानप, इंजी चोपडे, इंजी लोणकर, धनेश्वर खेत्रे सह विविध विभागाचे अधिकारी तसेच रोहयोचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version