Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिवाचीवाडी येथील ‘त्या’ कुटुंबाला खा.प्रितमताई मुंडे यांनी दिला लाखमोलाचा आधार, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे आर्थिक मदत सुपूर्द ; कुटुंबाचे केले सांत्वन

केज । दि. ०६ ।
पाटोदा-मांजरसुंभा दरम्यानच्या रस्त्यावर पाटोद्याच्या नजीक स्विफ्ट कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील एकाच कुटुंबातील सहा सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

अतिशय दुःखद आणि स्तब्ध करणाऱ्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना काळाने हिरावून नेल्याने कुटे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता, मयत व्यक्तींच्या आप्तजणांची भेट घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी त्यांना धीर दिला. अपघातात कर्त्या व्यक्ती मरण पावल्याने कुटे कुटुंब आधारहीन झाल्याची शोकभावना व्यक्त करत होते, खा.प्रितमताईंनी या कुटुंबियांना आधार देत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आर्थिक मदत सुपूर्द केली. ‘कुटे कुटुंबाच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत’ असा विश्वासही यावेळी त्यांनी शोकसंतप्त परिवाराला दिला.

•••••

Exit mobile version