Site icon लोकाशा-बंब न्यूज

टीव्ही बंद करू जरा

Sushant Singh Rajput

दिल्लीतले सी.एन.एन .पासून ते राष्ट्रीय ओळख असलेल्या द हिंदू पासून ते ऑफ इंडिया वाले सर्व माध्यमानी सुशांत राजपूत या लढवय्या हुतात्म्यावर देशाला वेठीस धरले , काल त्याच्या कथित मैत्रनीची चौकशी काय केली तर लव्ह सेक्स धोका असी थेट बेडवरूनच पत्रकारिता केली गेली , दिल्लीचा पूर्ण मिडिया सुशांत वरून अशांत होता . एकाच्या आत्महत्येवरून पत्रकारितेची हत्या होताना हा दिवस गेला पंधरवाडा सहन करत आहेत , पायी चालणारे बिहारी मरतात तेव्हा दिल्लीचा मिडिया ड्रेस च्या रंगातले मास्क बांधून बातम्या सांगत होते मात्र वीर सुशांत जसाच स्वइच्छेने इहलोकातून गेला तसाच हिंदी मिडीयाने छाती बदडू बदडू घेतली . सुशांत नावाच्या माणसाच्या अपवित्र रीस्ते त्याच्या मृत्यूचे कारण मान्य करायला उत्तर भारताला आणि वृत्त देणाऱ्या वाहिन्यांना जड जात आहे , हाच तो मिडिया आहे जेव्हा लातूर चे जस्टीस लोयाच्या वेळेत तोंडात बोळा घेऊन गप्प होता , ठेवलेल्या पत्रकारितेतून बातमीदारी नाही तर राजकीय अजेंडे शब्दबद्ध होत आहेत , बातम्या सांगताना संगीत बाज देऊन लोकांच्या अवधान केंद्रित नियंत्रित करून मंद ठेवण्याचे काम साधले जात आहे , कोरोनात देशाचे सरकार सपशेल फेल गेले असताना राफेल राफेल करून लोकांच्या कानाचा पडदा फाडणाऱ्या वृत्त वाहिन्यांना अमित शहांच्या पक्षाचे गोडवे गाण्यात धन्यता वाटत आहे काय ? लोया सारख्या न्यायधीशाचा संशयित मृत्यू बातमी वा चर्चेचा विषय कुठल्या शहाच्या भीतीने घेतला जात नाही .
पोलंड मधील माध्यम जेव्हा सरकारचे गोडवे गाऊ लागली तेव्हा तेथील लोकांनी आपल्या टीव्हीचे तोंडे रस्त्याकडे केली व निषेध केला , एक काळ होता संध्याकाळी ७ ला मराठी ८ ला हिंदी व पावणे नऊ ला इंग्लिश बातम्या पाहून देशाची स्थिती लोकांना कळत असे मात्र आता २४/७ वेळात वृत्त वाहिन्या घसा ताणून नेमक्या कुठल्या बातम्या सांगतात , कुणाला एवढी घाई आहे म्हणून ब्रेकिंगचा ऊत दर्शकांना फेस आणत आहे , नेमके कशासाठी कुणी अपेक्षा व्यक्त केल्यात , आणि पत्रकारिता म्हणजे काय , रुबिका अंजना , शर्मा या महिला पत्रकारिता कमी अन मोडेलिंग अधिक करतात रुबिका लियाकत नावाची महिला पत्रकार लोक कोरोना संकटात असताना मास्क आणि झगा एकाच रंगाचा घालून बातम्या सांगत होती का मोडेलिंग त्यांनाच ठाऊक , सरकारच्या भूमिकेच्या पूर्वीच पाकिस्तान आणि चीन संदर्भात दिल्लीच्या मीडियाची भूमिका तर कीव येण्यासारखी होती , उतावीळतेचा विक्रम ब्रेकिंग करताना महाराष्ट्रातील वृत्तवाहिन्या कमी नाहीत , तसे पाहता मुंबईत असणाऱ्या माझ्या तुझ्या सर्वच वाहिन्या दिल्लीच्या बड्या मगरीचे पिलुंड असल्या सारखी , कोरोना मध्ये लोक आपले जीवन शोधत आणि राखत असताना दिल्लीच्या मिडीयाने दिवसभर राफेल चे विमाने असेच फिरवले अर्धा भारत झोपताना देखील ज्युई ज्युई फील करत असेल , कशासाठी , महाराष्ट्रा तील एका वृत्त वाहिनेने तर १ मिनिटात राफेल ६ हजार किमी जाते म्हणून वेगवान फेकले , किमान बातम्या पाहण्यासाठी लोकांनी आता पर्याय बदलले पाहिजेत , टीव्ही हा बातम्या पाहण्यासाठीच साधन राहिलेले नाही कारण त्यावरून निवेदक एक तर कार्यकर्ते असताना अथवा मग ते कधी सैनिक असतात ते पण आपल्या शहा साठी लढणारे .
सुशांत राजपूत साठी राजकीय व पत्रकारितेतील दिग्गज एकत्रित येतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर कुणी फारसे बोलत नाही , शेतकऱ्यांच मरण रुटीन झाल , सुशांत सारखा रंगेल आत्महत्या करतो तेव्हा त्या बातमीला टीआरपी असतो . वृत्त वाहिन्या बातम्या नाही धंदा करतात , अन त्यांचा धंदा ज्यात आहे तेच दाखवणे व्यवसायिक गरज असते , अमुक वृत्त वाहिनीचे मालक सत्ताधारी पक्षाच्या कोट्यात खासदार कशाला व्हायला हवा ? बातम्या पाहताना आमच्या बुद्धी आणि मानसिकतेवर राफेल मधून हल्ला होत असल्याचे कळण्यापूर्वी निवडणुका संपलेल्या असतात , देश अश्या काळात आहे जिथे लोकशाही संवर्धनाच्या मुलभूत गरजा पूर्ण होताना दिसत नाहीत , माजी सरन्यायधीश राज्यसभेच्या खासदारकीसाठी ज्या व्यक्ती समोर झुकतात त्या व्यक्तीवर न्यायधीशाच्या हत्येचा संशय आहे ? कोरोना संकटात सरकारचे सर्व निर्णय सपशेल फसल्या नंतर लोकांनी त्यावर नाराजी व्यक्त करू नये यासाठी ५ विमानांचे खेळ दिवसभर जनतेला दाखवले जातात आणि त्यासाठी १० वृत्तवाहिन्या खपल्या जातात . अमिताभ बच्चन च्या कोरोनाची बातमी दाखवण्यात अगदी तेव्हा केव्हा केव्हा काय काय करतात याची अपडेट देशाने कुणाला मागितली होती का मात्र लोकांनी मिम्स बनवून मीडियाची खिल्ली उडवावी एवढी लाजिरवाणी वेळ वृत्त वाहिन्यांनी आणली असेल तर लोकांनी टीव्ही पाहणे बंद केले तर काय बिघडले .

Exit mobile version