बीड प्रतिनिधी
शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांच्या मातोश्री शशिकला भीवसेन तुपे वय वर्ष 70 यांचे अल्पशा आजाराने 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर बीड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांच्या पश्चात चार मुली एक मुलगा सुना, जावई, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. त्या मनमिळाऊ व धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे सर्व परिसरात सुपरिचित होत्या.त्यांचा अंत्यविधी दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दगडी शहाजानपूर तालुका जिल्हा बीड येथे होणार आहे.तुपे कुटुंबीयावर कोसळलेल्या दुखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.
पीएसआय मीना तुपे यांना मातृशोक
