Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा.प्रीतमताईंमुळे गेवराईच्या युवकाचे वाचले प्राण


बीड, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी मला ६:४० वा.खासदार ताईसाहेब यांचा फोन आला, ताईसाहेब म्हणाल्या की आपण बीड शासकीय रुग्णालयात तात्काळ जा,मी तुम्हाला मेजेस करते व एक नंबर पाठवते, त्यांना तातडीने मदत करा.
ताईसाहेब यांनी मला एक मेसेज व मोबाईल नंबर Forward केला,त्यात असं लिहिलं होतं, खासदार ताईसाहेब मी अमोल जवरे रा.जव्हारवाडी ता.गेवराई माझ्या लहान भावाने विष प्राशन केले असून तो अतिशय सिरीयस असुन बीड शासकीय रुग्णालयात गेटसमोर रिक्षात असून तेथे त्याला Admit करून घेत नाहीत आपण मदत करावी असा मेसेज अमोल जवरे यांनी ताईसाहेब यांना केला होता.
तात्काळ मी शासकीय रुग्णालयात पोहचलो त्या विष पिलेला रुग्ण राहुल जवरे वय-२६ वर्ष याला अगोदर Casulty मध्ये Admit केलं Kmno4 solution gastric Lavage देऊन,call man ला सांगून physician ला बोलावून घेतले,मग ICU मध्ये Admit केलं 350 ML Organophosphorus poison घेतल्याने रुग्ण अतिशय गंभीर झाल्याने तातडीने त्याला डॉक्टरांच्या टीमने Intubate करून Ventilator वर घेऊन औषधोपचार सुरू केले. आज सोमवार सकाळी मी रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली, रुग्ण व नातेवाईक यांनी ताईसाहेब यांचे मनापासून धन्यवाद व आभार मानले असून, लवकरच ताईसाहेब यांची भेट घेणार असे त्यांनी सांगितले.तब्येत अतिशय चांगली असुन दोन दिवसांनी सुट्टी होणार आहे असे आपल्या पोस्टमध्ये भाजपचे लक्ष्मण जाधव यांनी म्हटले आहे.

Exit mobile version