बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : माणसाला आपल्या जीवनात कधी कोणत्या आजाराला तोंड द्यावे लागेल हे निश्चित सांगता येत नाही, अगदी खेळण्याच्या वयातच आवरगाव (ता.धारूर) येथील गोविंद सुदाम नखाते याला किडणीच्या आजाराने गाठले, त्याच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत. तो सध्या औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, आता त्याला त्याची आई किडणी देणार आहे, आईची किडणी मॅचही झालेली आहे, मात्र किडणी टान्सफरसाठी मोठा खर्च लागणार आहे, जो की गोविंद आणि त्याचे कुटूंबिय उचलू शकत नाहीत, त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्याला वाचविण्यासाठी दानशुर व्यक्तींना त्याला आर्थिक मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. दानशुरांच्या मदतीमुळे त्याचे प्राण वाचू शकतात. त्यामुळेच माणूसकीच्या नात्याने त्याला दानशुरांनी मदत करायलाच हवी.
दोन्ही किडण्या निकामी झाल्याने ‘गोविंद’ला आधाराची गरज ! कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये सुरू आहे आजाराशी झुंज, आता किडनी ट्रान्सफरसाठी हवीय आर्थिक मदत, मदतीसाठी दानशुर व्यक्तींनी पुढे यावे
