Site icon लोकाशा-बंब न्यूज

राज्यात पुढील पाच दिवसांत पावसाचे
पुर्नआगमन; हवामान खात्यानंतर
पंजाबराव डख यांचाही अंदाज


मुंबई, दि. 27 (लोकाशा न्यूज) : राज्यात पुढील पाच दिवसांत पावसाचे पुर्न्आगमन होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानंतर पंजाबराव डख यांनीही राज्यातील शेतकर्‍यांना पावसाबाबतचा अंदाज वर्तवला आहे. अवघ्या काही दिवसांत गणपतीचे आगमन होणार असून नेमकं गणेशोत्सव काळात पाऊस पुर्नआगमन करणार आहे.

काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यात कुठेही फारसा पाऊस पडलेला नाही. आता गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला असताना राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिल्हानिहाय हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पाऊस होत आहे. या व्यतिरिक्त राज्यात अन्य ठिकाणी कुठेही पाऊस नाही. त्यानंतर आता विदर्भात पाऊस तर अन्य ठिकाणी हलका पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबराव डख यांच्या अंदाजानूसार सध्या राज्यात सर्वत्र पावसाची उघडीप पाहायला मिळाली, मात्र 28 ऑगस्टला लातूर आणि नांदेड तसेच विदर्भात पुन्हा हवामानात बदल होऊन मुसळधार पाऊस कोसळणार आहे. पंजाबराव डख यांनी विदर्भात आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांना शेतातील कामे उरकून घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इतर भागातील शेतकर्‍यांना शेती कामे करता येणार आहेत. राज्यात गणपतीच्या दिवसांत बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडतो. पंजाबरावांनी या दिवसांमध्ये मौसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version