सिरसाळा न्यूज :
सोन्याचे आमिष दाखवून दोघांना फसवण्यात आल्याची घटना सिरसाळ्यात घडली आहे. एकाला चौदा लाखाला तर दुसऱ्याला अडीच लाखाला फसवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशन येथे ज्यांची फसवणूक झाली आहे त्या व्यक्तींनी तक्रार सिरसाळा पोलीस स्टेशन ला दिली आहे. एक तक्रारदार सिरसाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतीलच सोण्याचे व्यापारी तर दुसरे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरी येथील कपड्याचा दुकानदार आहे .
हा प्रकार खुप गंभीर आहे. दोन्ही तक्रारी लक्षात घेता मोठी टोळी सक्रीय असल्याचे समजते आहे. या टोळीच्या फासात अनेक जन अडकले असल्याची प्राथमिक महीती आहे. या संदर्भात गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यायला पाहिजे माञ तक्रारदरांची फक्त तक्रार घेतली आहे, गुन्हा मात्र सिरसाळा पोलीसांनी दाखल केला नाही.
● सिरसाळ्यात चोरट्याचं राज्य
: सिरसाळ्यात व परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून चोरटे/लफंग्यानी अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. कुठे मोबाईल चोरी, केठे वाहन चोरी,कुठे म्हैस, शेळी, माटार चोरी अशा विविध प्रकारच्या चो-या आणि यात आता बनावट सोने देऊन केलेली फसवणूक तर खुपच गंभीर प्रकार आहे. पोलिस प्रशासन ह्या प्रकारांना आळा घालण्यात अपयशी ठरत आहे.