Site icon लोकाशा-बंब न्यूज

सिरसमार्ग येथे सरपंच-उपसरपंच निवडणुकीनंतर तुफान राडा, महिला सरपंचास मारहाण; सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सीमा मार्कड तर उपसरपंचपदी भाजपाच्या मेघाताई पवळ

बीड ; ( प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील सरपंच-उपसरपंच निवडीला हिंसाचाराचे गालबोट लागले. दोन गटात तुंबळ मारामारी झाली. फुटलेल्या सदस्याना मारहाण करण्यात आली. तरटेवाडी आणि सिरसमार्गच्या ग्रामस्थामध्ये निवडणुकी नंतर मारहाण व दगडफेकीचे प्रकार घडले. नवनिर्वाचित महिला सरपंचासही मारहाण करण्यात आली. गुरुवारी अडीजच्या सुमारास हा प्रकार घडला. गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली.
दरम्यान सिरसमार्गच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सीमा सुरेश मार्कड यांची बिनविरोध निवड झाली तर नवनिर्वाचित सरपंचाने मतदान केल्याने, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सौ. मेघाताई अनिल पवळ यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे विनोद चव्हाण यांचा उपसरपंचपदाच्या निवडणुकीत एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे एक मत फुटले. सिरसमार्ग ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे सहा तर भाजपाच पाच सदस्य आहेत.


Exit mobile version