Site icon लोकाशा-बंब न्यूज

बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. प्रज्ञा खोसरेंनी घेतली बालगृहाची झाडाझडती, बालकांच्या छळ प्रकरणाची खोसरेंनी माहिती मागविली, प्रशासन दोषींवर कारवाई करणार


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : येथील बलागृहात आदिवासी चिमुकल्यांचा अनन्वित छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्याबाबतीत महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या अ‍ॅड प्रज्ञा खोसरे यांनी 22 ऑगस्ट 22 रोजी बीड येथील बालगृहाला भेट दिली व तेथील जो प्रकार घडला, त्याबाबत सविस्तर माहिती मागवली व या प्रकरणी प्रशासन दोषींवर योग्य ती कारवाई करेल असा विश्वास यावेळी त्यांनी बोलून दाखवला.
पुढे त्या म्हणाल्या समाजामध्ये बालकांचे प्रश्न त्यांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या बालकांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी तत्पर राहिले पाहिजे, बालकांच्या हक्कासाठी आपण नेहमी सतर्कता ठेवली पाहिजे आणि तिथे भेट दिल्यानंतर बालकांच्या सर्व हक्काबाबत त्यांच्या सर्व गोष्टी नियम व अटी बसूनच आपण सर्वांनी त्या प्रकारे कामे केली पाहिजेत, त्या ंसंदर्भामध्ये बालकल्याण समिती आणि जिमबा बरोबर बसून तशा प्रकारे सूचना करण्यात आल्या व मुलांच्या अत्याचार प्रकरणी कोणतीही गय केली जाणार नाही व दोषीवर प्रशासन योग्य ती कारवाई करेल असा विश्वास अ‍ॅड खोसरेंनी यावेळी बोलून दाखवला.

Exit mobile version