Site icon लोकाशा-बंब न्यूज

राज्यपाल कोश्यारी गोपीनाथ गडावर ; लोकनेत्याच्या समाधीचे घेतले दर्शन, मुंडेजी मेरे मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी”

परळी । दिनांक २०।
“गोपीनाथ मुंडे मेरे सहयोगी एवं मित्र थे, लोकनेता के रूप में उनकी याद हमेशा आती रहेगी” अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी जाग्या केल्या.

राज्यपाल कोश्यारी यांचे काल परळी शहरात आगमन झाले, त्यांचा चेमरी विश्रामगृहात मुक्काम होता. आज सकाळी लातूरकडे जातांना गोपीनाथ गडाला त्यांनी आवर्जून भेट दिली आणि मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. एका लेकीने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्मारक उभा केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे हे काम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे असं सांगत  "मुंडेजी मेरे सहयोगी और मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी" अशा शब्दांत त्यांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यपालांनी या भेटीत मुंडे साहेबांचा पुतळा आणि    गड परिसराची पाहणी केली.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हयातील व तालुक्यातील पदाधिकारी, लोक प्रतिनिधी, वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

••••

Exit mobile version