Site icon लोकाशा-बंब न्यूज

मेंगडेवाडीतील सप्ताहाच्या पंगतीच्या भगरीतून विषबाधा; 5 ते 7 जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल

बीड तालुक्यातील एका गावात विषबाधेचा प्रकार समोर आला असून या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढण्याचा आंदाज आहे. मेंगडेवाडी या गावातील सप्ताह पंगतीत खाण्यात आलेल्या भगरिमुळे 5 ते 7 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला असून उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय बीड येथे दाखल करण्यात आले आहे.
बीड तालुक्यातील चऱ्हाटा नजिक असलेल्या मेंगडेवाडी येथे पंगती मध्ये भगरीच्या भाकरी खाल्ल्याने 5 ते 6 जणांना विषबाधा झाली. हा प्रकार लक्षात येताच तत्काळ लक्षणे असलेल्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोरख शिंदे यांनी बाधितांना उपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले. अजून संख्या वाढण्याची शक्यता असून लक्षणे असलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

Exit mobile version