Site icon लोकाशा-बंब न्यूज

क्रीडा स्पर्धेत पोलिस मुख्यालयाच्या संघाने पटकावले विजेते पद, पुरूषांमध्ये युवराज पवार तर महिलांमध्ये अर्चना आघाव ठरल्या सर्वोत्कृष्ठ खेळाडू, बक्षिस वितरण करून स्पर्धेत यश मिळविलेल्या खेळाडूंचा कलेक्टर, एसपी अन् एएसपींनी केला सन्मान


बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने जिल्हा पोलिस क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेे.
दि. 3 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेचा समारोप शुक्रवारी सायंकाळी येथील पोलिस मुख्यालयावर करण्यात आला. या वर्षीच्या या क्रीडा स्पर्धेत पोलिस मुख्यालयाच्या संघाने सर्व साधारण विजेते पद पटकावले आहे. तर या स्पर्धेत पुरूषांमध्ये पोलिस अंमलदार युवराज पवार तर महिलांमध्ये पोलिस अंमलदार अर्चना आघाव ह्या सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरल्या आहेत. या स्पर्धेत यश मिळविलेल्या खेळाडूंना बक्षिस वितरण करून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार आणि कविता नेरकर यांनी सन्मान केला.
पोलिस कर्मचार्‍यांमधील ताण-तणाव कमी व्हावा याकरिता दरवर्षी पोलिस दलाच्या वतीने जिल्हा क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाते, त्यानुसार यावर्षीच्या क्रिडा स्पर्धा तीन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान मोठा उत्साहात पार पडल्या. शुक्रवारी येथील पोलिस मुख्यालयावर सायंकाळी या स्पर्धेचा समारोप करून खेळाडूंना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, कविता नेरकर यांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी पोलिस कर्मचारी आणि नागरिक/पत्रकार यांची रस्सीखेच स्पर्धाही घेण्यात आली, या स्पर्धेमुळे पोलिसांमध्ये उत्साह तर वाढलाच मात्र हा क्षण नागरिकांना पोलिस खात्याच्या अजून जवळही घेवून गेला. वास्तविकत: या वर्षीच्या या क्रिडा स्पर्धेत पोलिस मुख्यालयाच्या संघाला सर्व साधारण विजेते पद मिळाले आहे. विशेष म्हणजे पुरूष कर्मचार्‍यांमध्ये पोलिस अंमलदार युवराज पवार तर महिलांमध्ये पोलिस अंमलदार अर्चना आघाव ह्या सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरल्या आहेत. महिलांच्या वैयक्तिक स्पर्धेत अनेक महिला कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. यामधील शंभर मीटर धावण्यामध्ये पो.अं. मिना वनवे प्रथम, अर्चना आघाव व्दितीय, 200 मीटर धावणे अर्चना आघाव प्रथम, मिना वनवे व्दितीय, चारशे मीटर धावणे अर्चना आघाव, मिना वनवे व्दितीय, आठशे मिटर धावणे अर्चना आघाव प्रथम, उषा चाटे व्दितीय, 1500 मिटर धावणे अर्चना आघाव प्रथम, उषा चाटे व्दितीय, पाच हजार मीटर धावणे अर्चना आघाव प्रथम, उषा चाटे व्दितीय, लांब उडी मिना वनवे प्रथम, अर्चना आघाव व्दितीय, गोळा फेक मिना वनवे प्रथम, अर्चना आघाव व्दितीय, भाला फेक अर्चना आघवा प्रथम, थाळी फेक मिना वनवे प्रथम, अर्चना आघाव व्दितीय, कुस्तीत (52 किलो) प्रतिभा सांगळे प्रथम, साळूंके व्दितीय क्रमांक मिळविला आहे. याप्रमाणे पुरूष गटातील वैयक्तिक स्पर्धेतही अनेक कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदविला होता. यामधील शंभर मीटर धावणे योगिराज कानतोडे प्रथम, शिवाजी राख व्दितीय, 200 मीटर धावणे शाम खाडे प्रथम, महादेव डाके व्दितीय, 400 मीटर धावणे योगिराज कानतोडे, विनोद कुटे व्दितीय, आठशे मीटर धावणे दिनकर कानडे प्रथम, रामेश्‍वर काकडे द्वितीय, 1500 मीटर धावणे रामहरी पटाईत, योगिराज कानतोडे व्दितीय, 5000 मीटर धावणे जाधव प्रथम, जालींदर बनसोडे द्वितीय, लांब उडी शाम खाडे प्रथम, रामहरी पटाईत द्वितीय, गोळा फेक महेश जोगदंड प्रथम, युवराज पवार द्वितीय,भाला फेक युवराज पवार प्रथम, महेश जोगदंड व्दितीय, थाळी फेक युवराज पवार प्रथम, महेश जोगदंड व्दितीय, कुस्ती 66 किलो गटात जालींदर बनसोडे प्रथम, मोहन दांडगे व्दितीय, 74 किलो गटात दिडे प्रथम, कृष्णा जायभाये व्दितीय, 84 किलो गटात बहिरवाळ प्रथम, अनिल शेळके व्दितीय, स्विमींग 50 मी.फ्रि. स्टाईलमध्ये दिलीप गिते प्रथम, बागवान द्वितीय, 100 मी.फ्रि. स्टाईलमध्ये तावने प्रथम, कडू व्दितीय, बटरफलाय विनोद कुटे प्रथम, संजय सोनवणे द्वितीय, वेट लिप्टींग 62 किलो गटात शाहिंशाह सय्यद प्रथम, गोरख राठोड व्दितीय, 69 किलो गटात राजेश घनघाव प्रथम, रूषी पोटे व्दितीय, 77 किलो वजन गटात महाविर सोनवणे प्रथम, गायकवाड यांनी व्दितीय क्रमांक पटकावला आहे. सांघिक खेळातील फुटबॉलमध्ये पोलिस मुख्यालयाच्या संघाने प्रथम, बीड उपविभागाच्या संघाने व्दितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच हॉलीबॉल पोलिस मुख्यालय संघ प्रथम, बीड उपविभाग व्दितीय, बास्केट बॉल पोलिस मुख्यालय प्रथम, बीड उपविभाग व्दितीय, कब्बडी पुरूष गटात उप विभाग अंबाजोगाई प्रथम, पोलिस मुख्यालय द्वितीय, कब्बडी महिला गटात पोलिस मुख्यालय प्रथम, बीड उप विभाग व्दितीय, खो-खोच्या पुरूष गटात उप विभाग अंबाजोगाई प्रथम, पोलिस मुख्यालयाने व्दितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच संगित खुर्ची स्पर्धेत चित्रा आगळे प्रथम, दिपाली पाटील व्दितीय, रस्सीखेच स्पर्धेत पोलिस अधीकार्‍यांचा संघ प्रथम, निमंत्रीत व पत्रकारांचा संघ व्दितीय, 50 मिटर रेस (मुलं) अंभीत जोगदंड प्रथम, रूद्राक्ष गायकवाड व्दितीय, 50 मिटर लिंबू चमचा रेस (मुले) सोहम सोनवणे प्रथम, जिशान सय्यद व्दितीय, 50 मिटर लिंबू चमचा रेस (मुली) श्रुती साबळे प्रथम तर रेवा हजारे हिने व्दितीय क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेचे बक्षिस वितरण झाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी केले. या कार्यक्रमाला डीवायएसपी अभिजित धाराशिवकर, शेषराव उदार, स्वप्निल राठोड, जायभाये, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ, बीड शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप, ग्रामीण ठाण्याचे संतोष साबळे, पेठ बीड ठाण्याचे केदार पालवे पाटील, शिवाजीनगर ठाण्याचे केतन राठोड, उमेश कस्तूरे, एपीआय विलास हजारे, वाहतूक शाखेचे कैलास भारती यांच्यासह इतर अधिकारी आणि पोलिस कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. भारतीय दिव्यांग संघाचे कर्णधार ज्योतीराम घुले, राजू चव्हाण, सचिन धस, प्रा. डॉ. भालचंद्र सानप, सय्यद मुर्शराज, अभिजित तांदळे, गणेश जाधव, डॉ. तानाजी आगळे, सामेर शेख, भिमराव माने, अजहर सिद्दीकी, संतोष सौदंतीकर, फिरोज पठाण, प्रफुल्ल हाटवटे, शरद अंदुरे, प्रशांत जोजारे, शेख इसाक यांनी उत्कृष्ट पंचाची भुमिका बजावली यावेळी त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

रेवा हजारे या चिमुकलीने
सवार्ंचे लक्ष घेतले वेधून
पोलिस दलाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हा क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या आहेत. काल मुख्यालयावर यास्पर्धेचा जिल्हाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थित समारोप झाला. यावेळी मुलींची 50 मिटर लिंबू चमचा रेस घेण्यात आली, या स्पर्धेत द्वितीय क्रमांक जरी मिळाला असला तरी रेवा हजारे या चिमुकलीने आपल्या खेळीतून यावेळी जिल्हाधिकारी, एसपींसह सर्व अधिकार्‍यांचे लक्ष वेधून घेतले होते.

Exit mobile version