Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यातील बालकांचे सर्व प्रश्‍न सोडवू, बीडमधील आढावा बैठकीत बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या अ‍ॅड प्रज्ञा खोसरेंनी दिला विश्‍वास, बालविवाह रोखण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचे जिल्हा यंत्रणेला दिले आदेश

जिल्ह्यातील बालकांचे सर्व प्रश्‍न सोडवू
बीडमधील आढावा बैठकीत बाल हक्क संरक्षण आयोगाच्या
सदस्या अ‍ॅड प्रज्ञा खोसरेंनी दिला विश्‍वास, बालविवाह रोखण्यासाठी
प्रभावीपणे काम करण्याचे जिल्हा यंत्रणेला दिले आदेश
बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या अ‍ॅड प्रज्ञा खोसरे ह्या प्रभावीपणे काम करीत आहेत. त्यांनी चार ऑगस्ट रोजी बीडमध्ये एक आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील बालकांचे सर्व प्रश्‍न सोडवू असा विश्‍वास यावेळी त्यांनी या बैठकीत बोलून दाखविला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही, बालविवाह रोखण्यासाठी प्रभावीपणे काम करा, असे आदेशही या बैठकीत त्यांनी जिल्हा यंत्रणेला दिले आहेत.
4 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र राज्य बालक हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या अ‍ॅड प्रज्ञा सुदाम खोसरे यांनी बीड येथे बालकल्याण समिती, निरीक्षण गृह/ बालगृह, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बालविकास विभाग, सामाजिक संस्थांची आढावा बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करून जिल्ह्यातील कामकाजाची सद्य स्थिती समजून घेतली. जिल्ह्यात बालविवाह होऊच नयेत यासाठी आणखी समनव्य करून प्रयत्न करणे बाबत आणि जनजगृती उपक्रम घेण्यात यावेत, बाल संरक्षण क्षेत्रात कार्यरत स्टेक होल्डर यांच्यामध्ये समनव्याने कामकाज करण्यात यावेत, मुलींची विशेष काळजी घ्यावी, ग्राम सभेमध्ये बालविवाह होणार नाही असा ठराव ग्रामसभेत घेण्यात यावा, अशा चर्चेतुन मुद्दा समोर आल्यावरून तशी शासनास शिफारस करण्यात येईल, जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील यंत्रणांचा पुरेपूर वापर करून बालविवाह गावातच थांबले जातील, यासाठी आयोगाच्या स्थरावरून समनव्य करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. विशेषतः बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्यामुळे स्थलांतरित झालेल्या बालकांची आरोग्य आणि शिक्षणाविषयी चर्चा करण्यात आली व भविष्यात या बालकांच्या हितासाठी प्रयत्नशील राहु, असे त्या यावेळी म्हणाल्या. तसेच त्यांनी यावेळी स्वाधारगृह बीड येथे भेट दिली. संस्थेतील मुलींसोबत एकांतात चर्चा करून त्यांचे आरोग्य व इतर अडचणी समजून घेऊन त्या सुधारणा करण्यासंदर्भात त्यांनी यावेळी चर्चा केली. यावेळी त्यांना सदर बालगृहतील मुली आनंदी दिसून आल्या. बीड जिल्ह्यातील बालकांशी निगडित सर्व विषयावर सविस्तर चर्चा करून कामकाज अधिक अधिक प्रभावी व्हावे, या करिता सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बरोबर बालकांच्या हितासाठी चर्चा करून बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहु, असे आश्‍वासन यावेळी त्यांनी दिले.

Exit mobile version