Site icon लोकाशा-बंब न्यूज

पुन्हा कुमावतांकडून चंदन चोरट्यांचा पर्दाफाश, महाजनवाडीत छापा, चंदणासह 21 लाखांचा मुद्देमाल पकडला, दहा जणांवर गुन्हा दाखल


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत हे अवैध धंद्यावाल्यांना दणक्यावर दणके देत आहेत. त्यांनी पुन्हा एखदा चंदन चोरट्यांचा पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीची दखल घेवून स्वत: त्यांनी शनिवारी सायंकाळी बीड तालुक्यातील महाजनवाडीत छापेमारी करून चंदनासह 20 लाख 72 हजार सातशे रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हाही दाखल केला आहे. त्यांच्या या कारवाईमुळे पुन्हा चंदनचोरांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

शनिवारी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की मौजे महाजनवाडी (ता. बीड) येथील इसम नामे अशोक रामहारी घरत हा आपल्या स्वतःच्या फायदाकरिता बेकायदेशीरित्या काही इसमाच्या मदतीने शिवारातील शेतात चंदनाची झाडे चोरून तोडून आणलेल्या झाडांची खोडे तासून त्यातील गाभा चोरटी विक्री करण्यासाठी घरात आणून ठेवला आहे, अशी माहिती मिळाल्यावर सदरची माहिती मा,पोलीस अधीक्षक साहेब बीड यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली स्वतःसहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब व त्याच्या पथकातील पोलीस पथकातील पोलिस अंमलदारांनी सदर ठिकाणी जाऊन सहा वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी चंदनाची खोडे तासीत असणारा एक इसम जागीच मिळून आला, त्यांस ताब्यात घेऊन नाव, गाव विचारता एक अशोक रामहारी घरत (रा, महाजनवाडी) असे सांगितले त्याचे घराची झडती घेता घरात 499 किलो चंदनाची तासलेला गाभा, लाकडे, वजन काटा, वाकस व कुर्‍हाडी व बोलेरो पिकअप असा एकूण 20,72,700 रुपयांचा माल जप्त करून एकूण 10 आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे नेकनुर येथे पोलीस हवालदार बालाजी शेषेराव दराडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन नेकनुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक कवीता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत, बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे,अमजद सय्यद ,राजू वंजारे ,रामहरी भांडाने, संजय टूले ,शिवाजी कागदे दीपक जावळे मापोना अशा चोरे यांनी केली आहे.
Exit mobile version