Site icon लोकाशा-बंब न्यूज

गेवराईत जुन्या वादातून तरुणाचा खून

गेवराई, दि.२० (लोकाशा न्युज):- सध्या सुरु असलेल्या आखाड महिन्या निमित्त संजयनगर येथील घरी कंदुरीचा कार्यक्रम आटोपल्या नंतर तीन जणांनी जुण्या खेळलेल्या पत्याच्या व हार जितीच्या वादातुन एका २५ वर्षीय व्यक्तीला लाथा बुक्याने मारहाण करत घरा समोरील रस्त्यावरील नालीवर खुन करुन तरुणाचा मृतदेह फेकून दिल्याची घटना बुधवार दि.२० रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास शहरातील संजय नगर भागात उघडकीस आली आहे.या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पोलीसांनी राञी सुरु केली होती.
बाबु शिवराम शेनुरे वय २४ राहणार संजय नगर गेवराई असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुण्चे नाव असुन तो शहरात विविध भागात फिरून भंगार घेण्याचा व विकण्याचा व्यावसाय करत होता.बुधवार रोजी आषाढ महिन्या निमित्त पाहुण्याच्या घरी देवदेवताचा म्हणजे बोकडाचा कार्यक्रम असतो त्याच प्रमाणे बाबु शिवराम शेनुरे यांच्या घरी देखील कार्यक्रम होता.कार्यक्रम आटपुन सर्व पाहुणे आपआपल्या घरी गेले त्यानंतर बाबु शिवराम घरी झोपला होता.सायंकाळी ६.३० च्या सुमारास आलेल्या पाहुण्या पैकी तीन जण रा. पाचोड तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद या तीन जणांनी शिवराम शेनुरे यांना पहिल्यांदा मारहाण केली.नंतर जुण्या पत्याचा वादाचे कारण त्याला सांगुन त्यास तीन जणांनी पुन्हा हाताने लाथाने व काठ्याने मारहाण करत घरा समोरील रस्त्यावरील नालीवर फेकून दिल्याने यात त्यांचा मृत्यू झाला आहे.त्यानंतर हे तीघेही पळुन गेले आसल्याची माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती गेवराई पोलीसांना दिल्या नंतर सपोनि संदिप काळे,सपोनि संतोष जंजाळ,पोलीस उप निरीक्षक पवार,सुरेश पारधी,शेखर हिंगावार,किरण पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन नंतर पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय नेला.या प्रकरणी उशिरा पर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.माञ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली आसल्याचे दिसुन येत आहे.या घटनेने गेवराई शहरातील संजयनगर भागातील तरुणांमधे तणावाचे वातावरण निर्माण झाले आसल्याचे राञी दिसुन आले आहे.गेवराई पोलीस याबाबत आता जातीने तपास करीत आहे.

Exit mobile version