Site icon लोकाशा-बंब न्यूज

जेव्हा खासदारांचा रात्री फोन खणखणतो,घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी


अंबाजोगाई(प्रतिनिधी)-रात्री अकरा वाजुन पस्तीस मिनिटांनी मोबाईल खणखणतो. झोपेत असल्याने पहिल्या रिंगला फोन घेतला नाही. दुसर्‍यांदा पुन्हा फोन खणखणला तेव्हा डोळे उघडझापीत फोन घेतला तिकडून आवाज आला….रामभाऊ प्रितमताई बोलतेय बसस्थानकावर 35 मुलं अडकलेत त्यांना परभणी जाण्यासाठी वाहन मिळत नाही. अगोदर प्रवासाची सोय करा.एस.टी.आगाराशी बोला. नाही तर मग संस्था कार्यालयात मुलांची व्यवस्था करून त्यांना जेवण द्या. ही सुचना होती जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडेंची. दिल्लीत कार्यकर्त्यांचा फोन त्यांना रात्री जातो. बसल्याजागी त्या सुत्रे हालवतात. त्यातुन नेतृत्व कुठेही असलं तरी घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी असंच म्हणावे लागेल.
आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अभ्यास वर्ग कपीलधार ता.बीड येथे संपन्न झाल्यानंतर परतीच्या मार्गावर परभणीकडे जात असलेले कार्यकर्ते अंबाजोगाई बसस्थानकावर रात्री 11 वाजता उतरले. ज्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थीनीचा समावेश होता. रात्रीची वेळ झाल्याने त्यांना प्रवासासाठी एस.टी.बसही वेळेवर नव्हती. त्यातल्या अंजिक्य पांडव नावाच्या एका परिषदेच्या कार्यकर्त्याने थेट जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडेंना फोन लावुन आम्ही इथे आडकलो, आमची व्यवस्था करा अशी मागणी केली. खरं तर रात्र समयी एखाद्या प्रश्नाची दखल वर्तमान राजकिय व्यवस्थेत पुढारी घेतातच असे नव्हे. मात्र प्रितमताई असं एक नेतृत्व दिवसरात्री संकटात मदतीला धावुन येतात. लाटकरच ऐकुन घेतल्याबरोबर त्यांनी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांना फोन लावला. तात्काळ बस स्टँडवर जा, त्या मुलांची सोय करा. वाटल्यास स्पेशल बस मिळेल का बघा. अन्यथा आपल्या संस्थेच्या कार्यालयात त्यांची सोय करा. जेवण झालं का नाही त्याची काळजी घ्या. असं म्हणताच झोपेतुन उठता झालेले कुलकर्णी बसस्थानकाच्या दिशेने निघाले. खासदारांनी लाटकर यांचा फोन मॅसेजवर दिलाच होता. तिकडे जाताना फोन लावला. तेव्हा ते म्हणाले आम्हाला परभणीकडे जाण्यासाठी एस.टी.मिळाली आमचा प्रवास सुरू झाला. खासदार ताईचे खुप खुप आभार मानले. हा विषय सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे की संकट कुठलही असो मुंडे भगिनी क्षणात धावुन येतात. त्यात प्रितमताई एक पाऊल मागे रहातच नाहीत. वास्तविक पाहता दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असुन अशा वेळी आपल्या जिल्ह्यात एखाद्याचा फोन येतो आणि सर्व बाजुला ठेवुन त्या पुढाकार घेतात. त्याचाच अर्थ नेतृत्व कुठंही असलं तरी त्यांच्या अंगी असलेली आभाळमाया घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. म्हणुनच या नेतृत्वावर अठरापगड जातीधर्माचे लोक प्रचंड प्रेम करतात. खासदारांच्या बाबतीत असे अनेक अनुभव सर्वसामान्य जनतेला आलेले असतात. विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी खासदारांच्या भुमिकेचं दुसर्‍या दिवशी फोन लावुन कौतुक केलं. राजकिय व्यवस्थेत सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर राजकारणी अशा प्रकारे जर मदतीला धावुन येवु लागली तर खर्‍या अर्थाने कुणीतरी आपल्यासाठी पाठीमागे खंबीरपणे उभा असतं. हा आशावाद वृद्धिंगत होवु शकतो. खासदार एका फोनवर थांबल्या नाहीत त्यांनी पुन्हा बाराच्या सुमारास फोन लावुन सारे सुखरूप गेले का?अशी विचारणा केली. यापुर्वीही रंजल्या गांजल्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहाताना त्यांना पाहिलं. जिल्ह्यात दुष्काळाचं संकट असो किंवा अतिवृष्टीचे करोनासारख्या संकटात जिथे कुणी पाऊल ठेवेना त्या करोना रूग्णांच्याही भेटीला स्वत: धावुन गेल्या होत्या.

Exit mobile version