Site icon लोकाशा-बंब न्यूज

21 जुलैला देशाला नवा राष्ट्रपती मिळणार, राष्ट्रपती निवडणुकीसाठी 99.12 टक्के झाले मतदान, खा. प्रीतमताईंनी संसदेत उपस्थित राहून बजावला मतदानाचा हक्क


दिल्ली, दि. 18 (लोकाशा न्यूज) : राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून यामध्ये संसदेतील 99.18 टक्के खासदारांनी मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती चिफ रिटर्निंग अधिकार्‍यांनी दिली आहे. तर राज्यातील 283 आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे तर 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.
राष्ट्रपती पदासाठी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता मतदान संपलं. या निवडणुकीमध्ये एनडीएच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यामध्ये थेट लढत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मतदान केलं. तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 4800 खासदार आणि आमदारांनी मतदान केल्याची माहिती आहे. ुदेशभरातल्या 4025 आमदारांपैकी 3991 आमदारांनी आणि तर 771 खासदारांपैकी 763 खासदारांनी मतदान केलं. ही मतदानाची टक्केवारी एकूण 99.12 टक्के इतकी आहे. संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधकांच्या बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मतदान केलं. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संध्याकाळी चार वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तृणमूल काँग्रेसने विरोधकांचे उमेदवार यशवंत सिंन्हा यांना पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस आमदार राहुल गांधी यांनी पावणे चार वाजता संसदेमध्ये आपल्या मदतानाचा अधिकार बजावला. तसेच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरूर यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.

खा. प्रीतमताईंनी संसदेत उपस्थित
राहून बजावला मतदानाचा हक्क
सोमवारी नव्या राष्ट्रपतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली, या निवडणूकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपती मुर्मू ह्या नक्कीच विजयी होतील असा विश्‍वास संपूर्ण देशाला आहे. याच विजयाचे एक मत बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांनी दिले आहे. त्यांच्याबरोबर देशाच्या आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि खा. रक्षाताई खडसे यांनीही काल राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.

Exit mobile version