Site icon लोकाशा-बंब न्यूज

पेट्रोलचे दर पाच रुपयांनी तर डिझेलचे दर तीन रुपयांनी कमी झाले, सरकारचं सर्वसामान्यांना आणखी एक मोठं गिफ्ट

मुंबई, 14 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. पेट्रोलचे दर पाच रुपयांनी तर डिझेलचे दर तीन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाल्याने इतर वस्तूंचे दर कमी होण्यासही येत्या काळात मदत होईल.
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देणार असल्याचा शब्द दिला होता. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना केली होती. अनेक राज्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर व्हॅट कमी केला होता. मात्र महाराष्ट्रात याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता.

मुख्यमंत्री शिंदेंचा मविआला दे धक्का, सरपंच निवडीचा निर्णय बदलला!

तुमच्या शहरातून (मुंबई)

मुसळधार पावसाचा फटका, मुंबईत उद्या होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द, विद्यापीठाचा मोठा निर्णय

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट, शिवसेनेविरोधात आता काँग्रेस-भाजप एकत्र येणार? फडणवीसांच्या ट्वीटने चर्चांना उधाण

महाराष्ट्र पाण्यात बुडाला, मुख्यमंत्री शिंदेंसह आमदार-खासदारांची स्नेहभोजन पार्टी!

मुख्यमंत्री शिंदेंचा मविआला दे धक्का, सरपंच निवडीचा निर्णय बदलला!

LIVE Updates : पुण्यातील कोंढवा परिसरात वाड्याची भिंत कोसळली, 11 जणांची सुखरूप सुटका

अमित ठाकरेंना शिंदेंच्या टीममध्ये मंत्रिपद? राज ठाकरे संतापले, एक शब्दात दिले उत्तर

देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्डचे धागेदोरे, छोटा शकीलचा जवळचा अजय नावंदरला बेड्या

BREAKING : ‘मातोश्री’चे महत्त्व झाले कमी? भाजपचा आणखी एक उद्धव ठाकरेंना धक्का, मुर्मू यांचा मोठा निर्णय

LIVE Updates : ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा, जिल्ह्यातील सर्व शाळांना दोन दिवस सुट्टी

मुंबई

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपय

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार.
राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा.
बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा.
आणीबाणीच्या काळात ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान करण्याची योजना पुन्हा सुरु करणार.

Exit mobile version