मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या संततधारेमुळे खरीप पिकांचे नुकसान होते आहे, अंबाजोगाई तालुक्यात ही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे, याची गांभीर्याने दखल घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व प्रशासनाशी संपर्क केला व तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे सूचित केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे ओढावलेल्या संकटात खा.प्रितमताई मुंडे यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथांची दखल घेतल्याबद्दल शेतकऱ्यांमधून खा.प्रितमताईंचे आभार व्यक्त केले जात आहेत.