गेवराई, दि.१० (लोकाशा न्युज):- गेवराई तालुक्यातील हिरापूर नजीक रविवार दि.१० रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास येथील राष्ट्रीय औरंगाबाद-धुळे सोलापूर महार्गावर पाच महिन्याच्या मुलीचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे.सदरील मुलीच्या अर्भकाचे लचके तोडल्याचे समोर प्राथमिक अंदाजानुसार समोर आले आहे.या घटनेने संपूर्ण गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडली आहे.या प्रकरणी गेवराई व बीड ग्रामीण पोलीस तपास करत आसल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.दरम्यान असे कृत्य करणा-या माता व पित्या विरुद्ध पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
या घटने संदर्भात मिळालेली माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील हिरापुर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर रस्त्यालगत एका लाल रंगाच्या बनियान मधील कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत मृत पाच महिण्याच्या मुलीचे अर्भक पुलावर पडले होेते.सदरची माहिती गेवराई व बीड ग्रामीण पोलीसांना परिसरातील नागरीकांनी दिली.घटनास्तळी पोलीसांनी धाव तत्काळ घेऊन घटनास्थळी भेट देथ पंचनामा केला आहे.सदरील या स्ञी जातीच्या अर्भकाच्ये शरीराचे अनेक ठिकिणचे लचके तोडल्या सारखे दिसून होते,सदर लचके कुत्राने तोडले असावा असा अंदाज असुन त्याच्या शरीरावर खोलवर जखमा आहे.घटनेचा पंचनामा बीड ग्रामीण पोलीसांनी केला असुन अर्भक बीड ग्रामीन पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान या घटनेनं संपुर्ण गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान गेवराई तालुक्यात असे प्रकार कोणते डाॅक्टर करतात काय व करत आहे का ? याचा तपास आरोग्य विभाग व गेवराई पोलीसांनी अंग झटकून करावा अशी देखील मागणी आता जोर धरुन होऊ लागली आहे.शिवाय असे कृत्य करणा-या विरुद्ध कडक कारवाई बीड जिल्हा प्रशासनाने करुन अशा प्रकारास खतपाणी घालणा-या लोकांविरुध्द गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.दरम्यान गत महिण्यातच अशाच अर्भक प्रकरणी बाबत गेवराई शहरातील नाव पुडे आले होते.याचा आता बीड जिल्ह्या प्रशासनाने जातीने लक्ष घालून सखोल तपास करावा अशी मागणी गेवराई व बीड जिल्ह्यातील नागरिकांमधून होऊ लागली आहे.