Site icon लोकाशा-बंब न्यूज

अमरनाथ यात्रेत अडकलेल्या परळीतील भाविकांना पंकजाताई मुंडेंनी दिला धीर, काळजी घ्या..कांहीही अडचण आली तर मला सांगा, प्रशासनाशी संपर्क साधून भाविकांना मदत करण्याची केली सूचना

परळी । दिनाक १० ।
“हॅलो… मी पंकजा मुंडे बोलतेय. कसे आहात… काळजी घ्या चिंता करू नका… मी आहे… कधीही.. कुठेही काहीही अडचण आली तर मला सांगा…” पंकजाताई मुंडे यांच्या या धिराच्या शब्दाने अमरनाथ यात्रेत अडकलेल्या परळीतील भाविकांना केवळ दिलासाच नाही तर आधार मिळाला आणि ते अक्षरशः भारावून गेले.

अमरनाथ यात्रेला गेलेले शहरातील तब्बल 24 भाविक अडकले असल्याची माहिती मिळताच पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. हे भाविक कुठे आहेत, कसे आहेत, प्रशासन सहकार्य करते का आदीबाबींची चौकशी केली. काळजी करू नका, मी आहे अशा शब्दांत धीर दिला. भाविकांनी देखील त्यांना तेथील परिस्थितीची माहिती दिली.

या भाविकांत संतोष अप्पा चौधरी, शैलेश कदम, किशन सपाटे, अविनाश चौधरी, संतोष साबळे, अनंत बंडगर, रत्नेश बेलुरे, रघुनाथ शिरसाठ, विशाल नरवणे, सोमनाथ गित्ते, सूरज भंडारी, महेश अण्णा शिरसाठ, गजानन हालगे, ज्ञानेश्वर साबळे, विठ्ठलराव साबळे, रामदासराव काळे, पद्माकर काळे, अविनाश वडुळकर, नारायण चौलवार, गजानन कुळकर्णी, आनंद अल्बिदे, धनंजय माळी, रमेश अण्णा संकले, दीपक मोडीवाले यांचा समावेश आहे. अशा संकटकाळात व कठीण प्रसंगात संपर्क साधुन धीर दिल्याबद्दल भाविकांनी पंकजाताईंचे आभार व्यक्त केले.
••••

Exit mobile version